Shiv Sena Symbol Case : 'मूळ पक्षचिन्ह आमचंच', Supreme Court सुनावणीपूर्वी Anil Parab यांचा दावा
Continues below advertisement
शिवसेना (UBT) नेते आणि विधानपरिषद सदस्य अनिल परब (Anil Parab) यांनी दिल्लीत शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या सर्वोच्च न्यायालयातील (Supreme Court) सुनावणीवर प्रतिक्रिया दिली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाला दिलेले पक्ष आणि चिन्ह चुकीचे असून त्यावर मूळ पक्षाचा म्हणजेच आमचा अधिकार आहे, असे ते म्हणाले. अनिल परब यांनी म्हटले की, 'आमचं म्हणणं अतिशय स्पष्ट आहे पिटीशन मध्ये की हा पक्ष आणि चिन्ह दिलेलंय ते चुकीचं आहे. मूळ पक्ष आमचा आहे आणि मूळ पक्ष आणि चिन्हावरती आमचा अधिकार आहे हे आमचं पिटीशन आहे.' गेल्या अडीच-तीन वर्षांपासून आम्ही आशावादी आहोत आणि न्यायव्यवस्थेकडून आम्हाला न्यायाची अपेक्षा आहे, असेही परब म्हणाले. यावेळी त्यांनी बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोहित कंबोज (Mohit Kamboj) यांच्यावरील आरोपांवर बोलताना, पोलीस योग्य तो तपास करतील असे सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement