Anvay Dravid U19 Selection: राहुल Dravid यांच्या मुलाची Team India मध्ये एन्ट्री
Continues below advertisement
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा मुलगा अन्वय द्रविडने क्रिकेटच्या मैदानात महत्त्वपूर्ण पाऊल टाकले आहे. अन्वय द्रविडची आगामी तिरंगी मालिकेसाठी भारताच्या १९ वर्षांखालील 'ब' संघात यष्टीरक्षक-फलंदाज म्हणून निवड झाली आहे. ही मालिका १७ नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान बंगळूरु येथे होणार असून, यात भारत 'अ', भारत 'ब' आणि अफगाणिस्तानचे १९ वर्षांखालील संघ सहभागी होतील. बीसीसीआयच्या ज्युनियर निवड समितीने या संघांची घोषणा केली. अन्वय द्रविडने यापूर्वी विनू मंकड ट्रॉफीमध्ये कर्नाटक संघाचे नेतृत्व केले होते आणि त्याच्या सातत्यपूर्ण कामगिरीमुळे त्याची ही निवड झाली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement