Voter List Row: 'बोगस मतदार आले तर चोप देऊ, शिवसेना नेत्याचा थेट इशारा
Continues below advertisement
बदलापूरमधील मतदार यादीत (Voter List) झालेल्या गोंधळावरून शिवसेनेचे (ठाकरे गट) शहरप्रमुख वामन म्हात्रे (Vaman Mhatre) यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. 'हे मतदार मतदान करायला आले तर त्यांना चोप देऊ', असा थेट इशारा वामन म्हात्रे यांनी दिला आहे. बदलापूर शहराच्या मतदार यादीत शहराबाहेरील तब्बल १७,००० मतदारांची नावे खोटी कागदपत्रे वापरून घुसवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी निवडणूक आयोगाकडे (Election Commission) तक्रार करण्यात आली असून, या सर्व बोगस मतदारांवर आणि त्यांची नावे नोंदवणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही म्हात्रे यांनी केली आहे. बदलापूरमधील प्रत्येक प्रभागात एकाच नावाची अनेक मतदार असल्याची गंभीर बाबही त्यांनी समोर आणली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement