Special Report Uday Samant Mahayuti : महायुतीत पुन्हा कुरबुरी, उदय सामंतांचा मित्रपक्षांना थेट इशारा

Continues below advertisement
चिपळूणमध्ये (Chiplun) महायुतीतील (Mahayuti) अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून, शिवसेना नेते आणि मंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी मित्रपक्षांच्या स्थानिक नेत्यांना थेट इशारा दिला आहे. 'कुणाला कुमकुमी असेल तर आपला धनुष्य बाण कसा चालतो हे नक्की दाखवून देण्याची जवाबदारी तुमच्यावर आहे', असे खडे बोल सामंत यांनी सुनावले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर स्वबळाची भाषा करणाऱ्या मित्रपक्षांतील नेत्यांना उत्तर देताना, जो शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न करेल, त्याला शिवसेना काय आहे हे दाखवून देण्याचे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी सामंत यांच्या वक्तव्याला फारसे महत्त्व देण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे. स्थानिक पातळीवर वर्चस्व दाखवण्यासाठी अशी वक्तव्ये केली जातात, महायुती लोकसभा आणि विधानसभेत एकत्र लढली आहे आणि आमचे सरकार मजबूत आहे, त्यामुळे अशा स्थानिक भाष्यांना गांभीर्याने घेऊ नये, असे पटेल यांनी स्पष्ट केले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola