Maharashtra Politics: 'राष्ट्रवादी सत्तेशिवाय तडफडणारा मासा', Shiv Sena च्या Tanaji Sawant यांची जहरी टीका
Continues below advertisement
शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) जोरदार हल्लाबोल केला आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेशिवाय राहू शकत नाही, पाण्यातून मासा बाहेर काढल्यावर कसा तडफडतो तसा राष्ट्रवादीला होतं,' अशी जहरी टीका तानाजी सावंत यांनी केली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकच असून त्यांनी हिंदुत्व स्वीकारले आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. महायुतीची तत्वे मान्य नसताना त्यांना आमच्यावर का लादण्यात आले, असा संताप व्यक्त करत सावंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला आघाडीत घेण्याच्या निर्णयावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement