Maharashtra Politics: महायुतीत बिघाडी? स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्याचे Ajit Pawar यांचे संकेत
Continues below advertisement
राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी महायुतीतील (Mahayuti) भवितव्याबाबत मोठे विधान केले आहे. केंद्रात आणि राज्यात भाजप (BJP), शिवसेना (Shiv Sena) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) यांचे सरकार असले तरी, स्थानिक पातळीवर स्वबळावर लढण्याचे संकेत अजित पवारांनी दिले आहेत. 'निवडून येण्याची क्षमता ज्याला आपण इलेक्टिव मेरिट म्हणतो ते बघून तिकीटं द्यायचं असं तत्वतः ठरवून लावलं,' असे अजित पवार यांनी पुण्यात स्पष्ट केले. यापूर्वी महायुतीच्या माध्यमातून निवडणुका लढवण्यावर तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांचे एकमत झाले होते. मात्र, आता स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्यात आणि तालुक्यात वेगवेगळा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे पवार म्हणाले. त्यामुळे जागावाटपावरून महायुतीत मतभेद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement