Pigeon Row: 'घरात आलेले उंदीर मारता, मग कबुतराची पूजा का?', Manisha Kayande यांचा थेट सवाल

Continues below advertisement
शिवसेनेच्या नेत्या मनीषा कायंदे (Manisha Kayande) यांनी कबुतरांवर केलेल्या विधानामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. 'घरात चार उंदीर आले तर आपण गणपतीचं वाहन म्हणून त्याची पूजा करत नाही, मग कबुतराला इतके महत्त्व का देता?', असा सवाल कायंदे यांनी केला आहे. मुंबईतील (Mumbai) कबुतरखान्यांमुळे (Kabutarkhana) होणाऱ्या आरोग्य समस्यांवरून (Health Hazards) वाद सुरू असताना कायंदे यांनी ही प्रतिक्रिया दिली. कबुतरांच्या विष्ठेमुळे आणि पंखांमुळे नागरिकांना फुफ्फुसाचे गंभीर आजार होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे. जैन समाजाच्या (Jain Community) विरोधाला उत्तर देताना, कबुतरांना खाद्य देणे हा धार्मिक मुद्दा नसून आरोग्याचा प्रश्न आहे, असे कायंदे यांनी स्पष्ट केले आहे. हा वाद मुंबई उच्च न्यायालयाच्या (Bombay High Court) कबुतरखान्यांवर बंदी घालण्याच्या आदेशानंतर सुरू झाला आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola