Vinayak Raut on Nanar Project | समर्थन करणाऱ्या शिवसैनिकालाही झोडून काढा : विनायक राऊत
नाणार रिफायनरी प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध कायम असल्याचं आज पुन्हा जाहीर करण्यात आलं. नाणारचं समर्थन करणाऱ्या शिवसैनिकालाही झोडून काढा असं आक्रमक वक्तव्य शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी केलंय. नाणारवर भूमिका स्पष्ट करण्यासाठी आज शिवसेनेची सभा पार पडली. यावेळी विनायक राऊत यांनी आक्रमक पवित्रा घेतला. गुजरातच्या दलालांना रिफायनरी हवी असल्याची टीकाही राऊतांनी केलीय.