Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज राहुल गांधी आणि उद्या प्रियंका गांधींची भेट घेणार

Continues below advertisement

सामनाच्या अग्रलेखातून यूपीएचं कौतुक केल्यानंतर शिवसेना आणि काँग्रेसमध्ये जवळीक वाढतेय. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज काँग्रेस नेते राहुल गांधी तर उद्या प्रियंका गांधी यांची भेट घेणार आहेत. आगामी पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्त्वाची मानली जातेय. विशेषतः उत्तर प्रदेशात शिवसेना काँग्रेसला मदत करणार का? याकडं लक्ष लागलंय. दुसरीकडे महाराष्ट्र काँग्रेसकडून वारंवार स्वबळाचा नारा दिला जातोय. त्यामुळे याबाबत राऊत-गांधी भेटीत चर्चा होणार का? आणि काँग्रेस हायकमांड याबाबत निर्णय घेणार का याबाबतची चर्चा सुरु आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram