Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीत Rahul Gandhi यांची भेट घेणार

लखीमपूर घटनेच्या पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत आज दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेणार आहेत. या भेटीत विविध विषयांवर राजकीय चर्चा होणार असल्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याआधीच केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola