Mahendra Dalvi Raigad : दिवाळीत गैरप्रकार होऊ नये यासाठी रायगडमधील शिवसेनेचं आंदोलन मागे
Continues below advertisement
अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी स्थानिक तरुणांना आरसीएफ (RCF) आणि गेल (GAIL) कंपन्यांमध्ये नोकरी मिळावी यासाठी पुकारलेले जनआंदोलन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मागे घेतले आहे. 'आमच्या मागण्या अमान्य झाल्यास काळी दिवाळी साजरी करू असा सज्जड दम देखील दळवींनी कंपनी प्रशासनाला दिलेला होता. सणासुदीच्या दिवसात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आंदोलन मागे घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मात्र, स्थानिक प्रकल्पग्रस्त आणि बेरोजगार तरुणांना नोकरीत सामावून घेत नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार, असा इशाराही आमदार महेंद्र दळवी यांनी दिला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement