Chhagan Bhujbal : मंत्री भुजबळांचा सत्ताधाऱ्यांविरोधात एस्गार, विखे-पाटील म्हणाले...
Continues below advertisement
बीडमधील ओबीसी महाएल्गार सभेनंतर सत्ताधारी महायुतीतील संघर्ष उफाळून आला आहे. मंत्री छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे, तर दुसरीकडे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला आहे. 'आम्ही त्यांना (विखे पाटील) सोडणार नाही, गप्प बसणार नाही,' असा थेट इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे. बीडच्या सभेत भुजबळांनी विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत, 'विखे आला आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये विकार पसरवून गेला' असे म्हटले. यावर विखे पाटील यांनी संयमी प्रतिक्रिया देत, भुजबळांसोबत बसून गैरसमज दूर करणार असल्याचे सांगितले. याच सभेत भुजबळांनी विजय वडेट्टीवार यांचा जुना व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर दुटप्पीपणाचा आरोप केला. याला उत्तर देताना वडेट्टीवार यांनी म्हटले की, नागपूरमधील ओबीसी मोर्चाच्या यशानंतर भाजपने मला टार्गेट करण्यासाठी भुजबळांना पुढे केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement