Mahendra Dalvi On Ajit Pawar: 'कोलाड नाक्यावर सत्तर हजार कोटींचा घोटाळा पाहिला,महेंद्र दळवींचा अजित पवारांवर आरोप
Continues below advertisement
शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी (Mahendra Dalvi) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. 'पार्थ पवार (Parth Pawar) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनीच घात केला', असा खळबळजनक गौप्यस्फोट आमदार महेंद्र दळवी यांनी केला आहे. यासोबतच, नाव न घेता तटकरेंवर टीका करताना, 'कोलाड नाक्यावरील सत्तर हजार कोटींचा घोटाळा देखील आम्ही पाहिला आहे', असे म्हणत त्यांनी भ्रष्टाचाराचेही आरोप केले आहेत. या आरोपांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात, विशेषतः महायुतीमध्ये, खळबळ उडाली असून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांमधील वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दळवींच्या या वक्तव्यांमुळे रायगडमधील राजकीय वातावरण तापले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement