Shiv sena MLA Disqualification Supreme court : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

Shiv sena MLA Disqualification Supreme court : शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणी कोर्टात सुनावणी
शिवसेना आमदार अपात्रता प्रकरणात उद्धव ठाकरेंच्या वतीने सुप्रीम कोर्टात करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुनावणी झाली. या प्रकरणात विधानसभा अध्यक्षांपुढे झालेल्या सुनावणीतली मूळ कागदपत्र सुप्रीम कोर्टाने मागवली आहेत. एकनाथ शिंदेंची मागणी सुप्रीम कोर्टाने मान्य केलीय. तसंच शिंदेंना १ एप्रिलपर्यंत किंवा त्याआधी प्रतिवाद दाखल करण्यात सांगण्यात आलंय. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता ८ एप्रिलला होणार आहे. ठाकरे गटाने सादर केलेले अनेक दस्तावेज खोटे आहेत असा दावा शिंदे गटाचे वकील हरीश साळवे यांनी केलाय. उद्धव ठाकरेंच्या सोबत किती आमदार होते, याबाबत सादर करण्यात आलेली कागदपत्रं विश्वासार्ह नाहीत असा दावा शिंदे गटाने आज केलाय. या प्रकरणावर नियमित सुनावणी व्हावी अशी मागणी ठाकरेंच्या वकिलांनी केलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram