MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी ठळक मुद्दे ABP Majha
MLA Disqualification Case : आमदार अपात्रता प्रकरणी ठळक मुद्दे ABP Majha
मुंबई : एकनाथ शिंदेंनी (Eknath Shinde) जून 2022 मध्ये बंडखोरी केली आणि भाजपसोबत (BJP) सत्तेत सहभागी होत मुख्यमंत्री झाले. शिंदेंच्या बडानंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) सुप्रीम कोर्टात (Supreme Court) धाव घेत याचिका दाखल केली. सुप्रीम कोर्टाने विधानसभा अध्यक्षांना निकाल देण्याचे आदेश दिले. त्यानंतर या संदर्भात अध्यक्षांसमोर सुनावणी झाली. सादर झालेले पुरावे, कागदपत्रं, नोंदवलेल्या साक्षी असा प्रवास करत अखेरीस शिवसेनेच्या दोन गटांमधील शिंदे गट की ठाकरे गट अपात्र (MLA Disqualification) ठरणार? याची तारीख जवळ येऊन ठेपली आहे. दोन्ही गटांकडून निकालाच्या बाजूने दावे केले जात आहेत. राहुल नार्वेकर तयार आहेत दोन्ही गट सज्ज झालेत.. काऊंटडाऊनही सुरू झालंय. आता प्रतीक्षा विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) काय निकाल देणार? त्यांच्याकडे काय पर्याय आहेत? याची चर्चा सुरू झाली आहे.
पुढच्या दोनच दिवसांत हे स्पष्ट होणार आहे की, मुख्यमंत्रीपदी विराजमान असलेले एकनाथ शिंदे आणि त्यांचे 16 आमदार अपात्र ठरतील का? आणि जर ते अपात्र झाले, तर राज्य सरकारचं अस्तित्व संपुष्टात येईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे जर पात्र ठरले तर उद्धव ठाकरे गटातील आमदार अपात्र ठरतील का? किंवा यापेक्षा वेगळा निकाल लागेल का? अशा अनेक शक्यता राजकीय वर्तुळात चर्चेत आहेत.