MLA Disqualification Case : पक्षप्रमुखांना पदाधिकारी निवडीचे अधिकार नाही, शिंदे गटाचा युक्तीवाद
Continues below advertisement
MLA Disqualification Case : पक्षप्रमुखांना पदाधिकारी निवडीचे अधिकार नाही, शिंदे गटाचा युक्तीवाद
मुंबई : आमदार अपात्रता प्रकरणाच्या (MLA Disqualification) सुनावणीला सुरूवात झाली आहे. आजपासून तीन दिवस ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू (Sunil Prabhu) यांची उलट तपासणी होणार आहे. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी (Mahesh Jethmalani) हे प्रभूंची उलट तपासणी घेत आहेत. 21 जून 2022 च्या ठरावावरून प्रभू यांना सवाल केले जात आहेत. 21 जूनचा ठराव कधी तयारच केला नव्हता असा दावा शिंदे गटाचे वकील जेठमलानींनी केला. हा दावा सुनील प्रभूंनी फेटाळला.
Continues below advertisement