राणे म्हणाले Milind Narvekarआत्ताचे शिवसेनाप्रमुख का?;नार्वेकरांच्या त्या ट्वीटचं फडणवीसांकडून समर्थन

Continues below advertisement

Milind Narvekar Tweet : आजच्याच दिवशी बाबरी मशीद पाडली होती. त्यासंदर्भात शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांनी एक ट्वीट केलं आहे. शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी अयोध्येत राममंदिर उभारण्यासाठी 6 डिसेंबर 1992 रोजी झालेल्या बाबरी विध्वंसाची आज आठवण करून दिली आहे. अयोध्येत राममंदिर निर्माणासाठी बलिदान केलेल्या शिवसैनिकांना कोटी कोटी नमन असं ट्वीट नार्वेकर यांनी केलं आहे. परंतु, या ट्वीटवरुन नारायण राणेंनी चिमटा काढला आहे. 

मिलिंद नार्वेकरांनी पुन्हा एकदा आठवण करुन दिली आहे. बाबरी मशीद पाडण्यात आली होती, त्यावेळी शिवसेनेचं योगदान मोठं होतं. त्यावेळी याची जबाबदारी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांनीही स्विकारली होती. अशातच त्या घटनेला 29 वर्ष उलटल्यानंतर मिलिंद नार्वेकरांनी एक सूचक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमधून एक इशाराच जणू नार्वेकरांनी दिला आहे. सध्या राम मंदिर निर्माण सुरु आहे, अशातच ही श्रेयवादाची लढाई म्हणावी लागेल. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अयोध्या दौरा केला होता. तर दुसरीकडे भाजपकडून काम मंदिराच्या निर्माणाची सुरुवात करण्यात आली आहे. अशातच या प्रकरणातील शिवसेनेचं योगदान विसरुन चालणार नाही, असा सूचक इशारा मिलिंद नार्वेकरांनी दिला आहे, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram