Shivsena Lilavati Hospital: शिवसेनेची लीलावती रुग्णालयाला धडक ABP Majha

खासदार नवनीत राणांवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरु असताना त्याचे फोटो आणि शूटिंग करण्यावरून शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज रुग्णालय प्रशासनाला जाब विचारला. माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि आमदार मनिषा कायंदे यांच्या नेतृत्वाखाली लीलावती रुग्णालयात पोहोचलेल्या शिष्टमंडळानं प्रशासनावर  प्रश्नांची सरबत्ती केली. एमआरआय तपासणी करताना कॅमेऱ्याला परवानगी कशी देण्यात आली, एमआरआय काढताना फोटो कसे निघाले असे एकापाठोपाठ प्रश्न शिष्टमंडळानं केले आणि त्यावेळी उपस्थित असलेल्या स्टाफला समोर हजर करण्यास सांगितलं. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola