Voter List Scam: मतदार यादीत गंभीर चूक, मुल-बापाचं नाव वेगवेगळ्या धर्माचे
Continues below advertisement
मुंबईतील वांद्रे (Bandra) येथील मतदार यादीत (Voter List) गंभीर चुका असल्याचे समोर आणत शिवसेनेने (Shiv Sena) निवडणूक आयोगावर (Election Commission) गंभीर आरोप केले आहेत. यादीतील त्रुटींवरून शिवसैनिक आक्रमक झाले असून, त्यांनी अनेक पुरावे सादर केले आहेत. 'इथं मुलाचं नाव दिलशाद नौशाद खान आहे आणि वडिलांचं नाव गजानन सुकनोजी कांबळे,' असा धक्कादायक प्रकार एका शिवसैनिकाने पुराव्यासहित समोर आणला. ही केवळ एक चूक नसून अशा अनेक चुका प्रत्येक पानावर असल्याचा दावा शिवसैनिकांनी केला आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तळागाळातील कार्यकर्ते आता प्रत्येक यादीची बारकाईने तपासणी करत असून, या चुका मुद्दाम केल्या गेल्याचा आरोप करत आहेत.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement