Bharat Gogawale On Raj Thackeray : चाटुगिरीची उपमा राज ठाकरेंना लागू होते, भरत गोगावलेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
निवडणूक आयोगाविरोधात (Election Commission) महाविकास आघाडी (MVA) आणि मनसेच्या (MNS) 'सत्याचा मोर्चा' आज मुंबईत निघणार आहे. बोगस मतदार वगळण्याच्या मागणीसाठी ठाकरे बंधू एकत्र आले आहेत, तर दुसरीकडे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरेंच्या जुन्या भाषणांवरून त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. ‘सरकारकडे सतत कर्जमाफी मागायला आम्ही भिकारी नाही’, असं म्हणत शेतकरी नेते राजू शेट्टींनी अजित पवारांना सुनावलं आहे. धुळे मतदार यादीत ४५ हजार बोगस नावे असल्याचा गंभीर आरोप माजी आमदार अनिल गोटेंनी केला आहे, तर सुधारित यादी जाहीर होईपर्यंत निवडणुका घेऊ नयेत अशी मागणी त्यांनी केली आहे. काँग्रेसने मात्र बिहार निवडणुकीमुळे या मोर्चापासून अंतर राखल्याचे चित्र आहे. या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजप बाबुलनाथ मंदिरात मूक आंदोलन करणार आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी शरद पवारांची, शिवसेना ठाकरेंची, पण भाजप कार्यकर्त्यांचा पक्ष आहे, असे विधान करून चंद्रकांत पाटलांनी नव्या चर्चेला तोंड फोडले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement