Shiv Sena Meeting on Assembly Election : विधानसभेसाठी शिवसेनेने कंबर कसली, 'वर्षा'वर बैठक

Continues below advertisement

विधानसभा निवडणुका जवळ आल्यानं सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केलीय.. शिंदेंच्या शिवसेनेनंही आज विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी बैठक घेतली..
विधानसभेच्या १०० जागा लढण्याची तयारी शिंदेंच्या शिवसेनेनं केलीय.. त्यासाठी १०० विधानसभा निरीक्षक आणि प्रभारीही नेमण्यात आले आहेत..
सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवा, सदस्य नोंदणीवर भर द्या अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत

सीएम यांच्या उपस्थितीत वर्षा बंगल्यावर शिवसेनाच्या बैठकीला सुरुवात,
विधानसभेसाठी किती जागा मागायच्या यावर देखील चर्चा होणार  

शिवसेनेच्या बैठकीतील मुख्यमंत्र्यानी घेतलेले निर्णय

विधानसभेच्या निवडणुकीत 100 जागा लढण्याची तयारी, त्यासाठी 100 विधानसभा निरीक्षक नेमण्यात आले, त्याचबरोबर प्रभारी सुद्धा नेमले गेले,

हे निरीक्षक आणि प्रभारी फक्त त्याच मतदारसंघासाठी काम करणार, एकच ठिकाणी लक्ष केंद्रित करणार आणि निवडणुकीची तयारी करणार, 

मुख्यमंत्री यांनी दिलेले आदेश

सरकारी योजना सर्व मतदारसंघात प्रसारित करा. 

सदस्यनोंदणीवर भर द्या. 

शिवसेना युवासेना महिला आघाडी पद नेमणूक करा.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram