Ajit Pawar Meeting : अजित गव्हाणे पवारांच्या राष्ट्रवादीत, अजित पवारांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

Ajit Gavhane NCP : अजित गव्हाणे पवारांच्या राष्ट्रवादीत, अजित पवारांची पदाधिकाऱ्यांशी चर्चा

माजी आमदार विलास लांडेंनी त्यांचे निकटवर्तीय अजित गव्हाणेंना शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पाठवलं, पण चोवीस तास उलटायच्या आतच विलास लांडे स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीसाठी हजर झालेत. आम्ही विलास लांडेंच्या मार्गदर्शनानेचं अजित पवारांची साथ सोडतोय, असं म्हणणारे अजित गव्हाणे अन त्यांचे समर्थक आता बुचकळ्यात पडलेले आहेत. अजित गव्हाणेंनी समर्थकांसह तुतारी फुंकल्यानंतर अजित पवारांनी आज पुण्यातील सर्किट हाऊसमध्ये पिंपरी चिंचवडमधील माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांना बैठकीसाठी बोलावलेली आहे. त्याच बैठकीला विलास लांडेंनी हजेरी लावल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसलाय. विलास लांडेंच्या डोक्यात नेमकं काय शिजतंय असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झालाय तर अजित गव्हाणे आणि समर्थकांची यानिमित्ताने कोंडी होणार हे ही उघड आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola