Shiv Sena Dasara Melava | दोन 'Shiv Sena' चे दोन 'Melava', दोन्ही पक्षांकडून जोरदार तयारी
Continues below advertisement
दोन शिवसेना गटांचे दोन मेळावे होणार आहेत. एक मेळावा शिवाजी पार्कवर ठाकरेंच्या शिवसेनेचा, तर दुसरा मेळावा नेस्को सेंटरमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा होणार आहे. महापालिका निवडणुका काही महिन्यांवर असल्याने या मेळाव्यांना महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवाजी पार्कवरील मेळाव्यासाठी स्टेज उभारणी आणि खुर्च्या लावण्याचे काम सुरू आहे. पावसामुळे मैदानात चिखल झाला असून शिवसैनिकांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पहिल्यांदाच खुल्या मैदानाऐवजी गोरेगाव नेस्को सेंटरमध्ये पार पडत आहे. मराठवाड्यातील पूरस्थिती लक्षात घेता, या भागातील पदाधिकाऱ्यांनी मेळाव्याला येऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत. खुल्या मैदानावर होणारा भव्य मेळावा टाळून त्यावर होणारा खर्च पूरग्रस्तांना देण्यात यावा असे शिंदे यांच्या शिवसेनेने म्हटले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement