Manoj Jarange | मनोज जरांगेंचा दसरा मेळावा होणारच, पोलिसांकडून मिळाली परवानगी
Continues below advertisement
मनोज जरांगे यांच्या दसरा मेळाव्याला पोलिसांकडून परवानगी मिळाली आहे. नारायणगडावरील मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे. जरांगे पाटील सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना ताप, सिव्हियर गॅसटाईटिस, वीकनेस आणि बॉडी पेनचा त्रास आहे. काल रात्री त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांनी केलेल्या टेस्टमध्ये गॅसटाईटिस आणि पोस्ट वायरल इन्फेक्शन असल्याचे निदान झाले आहे. डॉक्टरांनी त्यांना कंप्लीट रेस्टचा सल्ला दिला आहे. मात्र, या परिस्थितीतही जरांगे पाटील दसरा मेळाव्याला जाण्यावर ठाम आहेत. उद्या सकाळी दहा वाजेपर्यंत ते नारायणगडाच्या पायथ्याशी दाखल होतील अशी माहिती समन्वयक गंगाधर काळकुटे यांनी दिली. डॉक्टरांनी सांगितले की, "गोद्यापट्ट्यामध्ये सगळा तो पूर आल्यामुळे ते गेले होते। काल परत सिव्हियर गॅसटाईटिस झाला त्यांना वीकनेस होता। त्यानंतर बॉडी पेन खूप जास्त होतं त्यामुळे ते काल रात्री अँडमिट झाले होते। आपण काही टेस्ट केले आहेत तर टेस्टवर ही गॅसटाईटिस बऱ्यापैकी आहे। पोस्ट वायरल इन्फेक्शन पण आहे त्यांना तर आपण आता त्यांना कंप्लीट रेस्ट चं सजेशन दिलेलं आहे आणि ट्रीटमेंट सुरू आहे।"
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement