Sushma Andhare Shivsena: सुषमा अंधारे यांना शिवसेनेकडून उपनेतेपदाची जबाबदारी ABP Majha
शाहू-फुले-आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्या आणि गणराज्य संघाच्या प्रमुख सुषमा अंधारे आज शिवसेनेत प्रवेश करत आहेत. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत आज मातोश्री निवासस्थानी त्या शिवसेनेत प्रवेश करत आहेत. त्यासाठी त्या मातोश्री निवासस्थानी पोहोचल्या आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपासून त्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर होत्या. विधान परिषदेवर संधी मिळाली नसल्यानं त्या नाराज असल्याची चर्चा होती. आता त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय.