Shiv Pratishthan On Jamkhed Band : शिवप्रतिष्ठान संघटनेकडून बंदची हाक, भास्कर मोरेंच्या अटकेची मागणी

Continues below advertisement

Shiv Pratishthan On Jamkhed Band : शिवप्रतिष्ठान संघटनेकडून बंदची हाक, भास्कर मोरेंच्या अटकेची मागणी
शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संघटनेने आज जामखेड बंदची हाक दिली आहे. अहमदनगरच्या जामखेड तालुक्यातील रत्नदीप मेडिकल फाऊंडेशन अँड रिसर्च सेंटरचे अध्यक्ष भास्कर मोरे यांना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आलाय.रत्नदीप फाऊंडेशनचे अध्यक्ष भास्कर मोरे यांच्याकडून विद्यार्थ्यांना अवाजवी फी घेतात तसेच महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मानसिक त्रास दिला जातो, असा आरोप करत २०० पेक्षा जास्त विद्यार्थी -विद्यार्थिनींचं जामखेड तहसील कार्यालयासमोर मागील आठ दिवसांपासून ठिय्या आणि उपोषण आंदोलन सुरु आहे. डॉ भास्कर मोरे यांच्यावर जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. मात्र अद्यापही भास्कर मोरे यांना अटक न झाल्याने आज जामखेड बंदची हाक देण्यात आलीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram