Temple Reopen | शिर्डीचं साई मंदिर पुन्हा खुलं; पहाटेपासून भाविकांची दर्शनाला गर्दी
शिर्डीचं साई मंदिर आजपासून पुन्हा उघडण्यात आलं आहे. काकड आरतीनंतर साई दर्शनाला सुरुवात झाली. आठ महिन्यांनंतर मंदिंर खुलं झालं आहे. मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून आकर्षक रांगोळी सुद्धा काढण्यात आली आहे. पहाटेपासून भाविकांची दर्शनाला गर्दी होत असून पहिलाच दिवस असल्याने आलेल्या भक्तांना आयडी कार्ड पाहून दर्शनाला सोडत आहे. प्रवेश क्रमांक दोनवर मोठी रांग बाहेर लागली आहे.