Shirdi : साईंसाठी रथयात्रेला प्रशासनाची परवानगी; शिर्डीत साईभक्तांचा उत्साह

रंगपंचमीच्या निमित्ताने शिर्डी गावातून निघणारी साईंच्या रथयात्रेसाठी प्रशासनाची परवानगी मिळालीय.. येत्या २२ मार्चला ही मिरवणूक शिर्डी गावातून निघणार आहे.. तत्पुूर्वी सुरक्षेच्या कारणास्तव ही मिरवणूक रद्द करण्यात आली होती.. मात्र, साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हाधिकारी भाग्यश्री बानायत आणि पोलीस अधीक्षकांच्या चर्चेनंतर परवानगी देण्यात आली. यावर्षी होणारा रंगपंचमीचा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय साईबाबा संस्थानने घेतल्यामुळे ग्रामस्थांसह  साईभक्तांनी त्याचं स्वागत केलय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola