Delhi Blast Updates: दिल्ली बॉम्बस्फोटानंतर शिर्डीत हाय अलर्ट, Entry Points वर वाहनांची तपासणी तीव्र.

Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या बॉम्बस्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील शिर्डीमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिर्डीचे पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, साईबाबा मंदिराची सुरक्षा वाढवण्यात आली असून शहराच्या सर्व एंट्री पॉइंट्सवर वाहनांची कसून तपासणी सुरू करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक रणजीत गलांडे यांनी सांगितले की, 'दिल्लीतील घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून शिर्डी मंदिर परिसरात आणि शहरात सुरक्षा व्यवस्था अत्यंत कडक करण्यात आली आहे.' याअंतर्गत बॉम्ब शोधक आणि श्वान पथकाकडूनही तपासणी केली जात असून, भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola