Delhi Blast: 'कुठे गेली ५६ इंची छाती?', Nana Patole यांचा Modi सरकारवर हल्लाबोल
Continues below advertisement
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण स्फोटात नऊ जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. या स्फोटामागे जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून, तपास यंत्रणा पुलवामा कनेक्शनचीही चौकशी करत आहेत. 'दिल्लीमधील घटना ही देशावरचा भ्याड हल्ला असून देशाच्या सुरक्षेबाबत हे केंद्राचं अपयश आहे', अशी टीका काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केली आहे. या घटनेनंतर दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नियोजित भूतान दौरा कायम ठेवला असून, ते दोन दिवसांच्या दौऱ्यावर रवाना झाले आहेत. या दौऱ्यात ते भूतानच्या चौथ्या राजाच्या ७० व्या वाढदिवसाच्या सोहळ्यात आणि ग्लोबल पीस प्रेयर फेस्टिवलमध्ये सहभागी होतील.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement