Shirdi : नगरपंचायत निवडणुकीवर शिर्डीतील सर्वपक्षीय नेते, ग्रामस्थांचा बहिष्कार ABP Majha
Continues below advertisement
शिर्डी नगरपंचायत निवडणुकीवर सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलाय. गेल्या दोन दिवसांत या निवडणुकीसाठी एकही उमेदवारी अर्ज दाखल झालेला नाही. शिर्डी नगरपंचायतऐवजी नगरपालिका व्हावी अशी सर्वपक्षीय नेते आणि ग्रामस्थांची मागणी आहे. शहरातील वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन नगरपरिषद व्हावी आणि नगरपरिषद झाल्यास शहर विकासासाठी निधीदेखील वाढवून मिळेल अशी शिर्डीवासियांना आशा आहे. लोकसंख्येच्या आधारावर शिर्डी नगरपरिषद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. मात्र नगरपरिषद न झाल्याने शिर्डीतील शिवाजी गोंozaदकर यांनी अवमान याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी 7 डिसेंबरला होणार आहे.
Continues below advertisement