Shirdi | साईंच्या जन्मस्थळाचा वाद आणखी चिघळणार? शिर्डी बंदचा ग्रामस्थांचा इशारा | ABP Majha
साईंचं जन्मगाव परभणी जिल्ह्यातलं पाथरी की नगर जिल्ह्यातलं शिर्डी असा साईबाबांच्या जन्मस्थानावरुन सुरू असलेल्या वादाप्रकरणी नवीन महिती समोर आलीये. साई संस्थाननं 1994 ला प्रकाशित केलेल्या हिंदी साईचरित्रामध्ये साई बाबांचा जन्म हा पाथरी चा उल्लेख आहे. मात्र तो पाथर्डी नावानं करण्यात आलाय. संत दासगणू महाराज यांनी त्यांच्या ओवी मध्ये कृष्णाचा जन्म जसा मथुरेत झाला आणि ते गोकुळात आले तसाच साईबाबांचा जन्म शेलू मानवत म्हणजेच पाथरीत झाला आणि ते शिर्डीत गोकुळाप्रमाणेच आले असे सांगितलंय. पण शिर्डीकरांचा या दाव्याला विरोध आहे.