Shirdi : साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच
Continues below advertisement
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ नेमण्यासाठी उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दोन आठवड्यांची मुदत दिल्यानंतर आता महाविकास आघाडी सरकारला जाग आल्याचं दिसून आलंय. येत्या 22 जूनपर्यंत विश्वस्त मंडळ सरकारला नेमावे लागणार आहे. या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत रस्सीखेच सुरु असल्याचं पहायला मिळतंय. अध्यक्षपदी दोन्ही पक्षाकडून दावा करण्यात आला आहे. नगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्ष पदावर राष्ट्रवादीने दावा केला आहे. मुंबईतील सिद्धिविनायक ट्रस्टचे अध्यक्षपद हे शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीसाठी आता राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे.
Continues below advertisement