पेरणीसाठी पैसा, बँक कर्ज देत नाही, किडनी विकायला परवानगी द्या; बुलढाण्यातील पाच शेतकऱ्यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
पेरणीसाठी जवळ पैसा नाही आणि बॅंक पीककर्ज देत नसल्याने कंटाळून पाच शेतकऱ्यांनी त्यांची किडनी 50 हजार रुपयांना विकायला काढली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे परवानगी मागितली आहे. एकतर पीककर्ज द्या नाहीतर आमच्या किडनी विका अन् पेरणीसाठी आम्हाला पैसे द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या मागणीने मात्र जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.