Worli BDD Chawl : एकनाथ शिंदे - आदित्य ठाकरे एकाच मंचावर, कार्यक्रम नेमका कोणता?
उद्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार आहेत. वरळी बीडीडी चाळीच्या पुनर्विकास कार्यक्रमाच्या निमित्ताने हा सोहळा होणार आहे. दोन इमारतींमधील सदनिकांचे चावी वाटप केले जाणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, स्थानिक आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. मुख्यमंत्री फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्यासोबत अनेक मंत्री देखील उपस्थित असतील. स्थानिक आमदार म्हणून आदित्य ठाकरे यांना निमंत्रित करण्यात आले आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यावर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आता एकाच मंचावर येणार असल्याने या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या कार्यक्रमासंदर्भात आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे की, “वरळी बीडीडी चाळ जे पाचशे छप्पन्न घरं चावी वाटपासाठी आम्ही थांबलो होतो. पहिलं सांगितलं तर गुढीपाडवा, नंतर अनेक महिने निघून गेले. त्यानंतर आत्ता कुठेतरी ते चावी वाटप होतंय. मी आग्रही होतो आम्ही तिथे पूर्णपणे जोर लावला होता की गणपतीच्या आधी ते चावी वाटप व्हावं. पण याचसोबत आता आम्ही हे देखील आग्रह धरून बसलेलो आहेत की शिवडीमध्ये ज्या बीडीडी चाळी आहेत त्याचा पुनर्विकास एम”. ५५६ घरांचे चावी वाटप होणार आहे. शिवडी बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाची मागणी देखील यावेळी करण्यात आली आहे.