ABP News

Sharmila Rajaram ABP Majha : दही हंडी सोहळ्याचा उत्साह; 'माझा'वर शर्मिला राजारामसह

Continues below advertisement

Sharmila Rajaram ABP Majha : दही हंडी सोहळ्याचा उत्साह; 'माझा'वर शर्मिला राजारामसह

राज्यात सर्वत्र दहीहंडीचा उत्साह पाहायला मिळत असून डीजे गाण्यांच्या तालावर गोविंदांसह दहीहंडी प्रेमींदेखील थरकताना दिसून येत आहेत. मुंबई, पुण्यासह गावागावातही हा उत्साह आहे. मात्र, वर्धा जिल्ह्याच्या सालोड हिरापूर येथे दहीहंडीच्या एकदिवस अगोदरच या आनंदावर दु:खाचं विरझन पडलं. येथे नवीन आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी गेलेल्या दोन युवकांचा विजेचा करंट लागून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विद्युत वितरण महामंडळाच्या मुख्यवाहिनीवरुन थेट विद्युत पुरवठा घेण्याचा प्रयत्न या डीजेचालकांनी केला. मात्र, यावेळी विजेचा हायपॉवर विद्युत धक्का बसल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. सालोड (हिरापूर) येथे ही घटना घडली. सूरज चिंदूजी बावणे वय (27 वर्षे) आणि सेजल किशोर बावणे वय (13 वर्षे) अशी दोन्ही मृतांची नावे आहेत. 

नवीन डीजे व धमाल पार्टी तयार केली असून आता सोमवारी गोकुळ जन्माष्टमी असल्याने दहीहंडी (Dahihandi) उत्सवाची ऑर्डर होती. त्यामुळे नव्याने आणलेल्या डीजेची तपासणी करण्यासाठी सेटअप तयार करून विद्युत जोडणी (Electricity) सुरू केली. याकरिता विद्युत तारांवरून थेट विद्युत पुरवठा घेण्याच्या प्रयत्नात असतानाच सूरज व सेजल या दोघांना विजेचा धक्का बसला. दोघेही विद्युत तारांना चिकटल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. विशेष म्हणजे दोघेही रात्रभर तारांना चिकटलेल्या अवस्थेतच राहिले, तरीही कोणाला लक्षात आले नाही. सकाळी झोपेतून उठल्यानंतर घरच्यांच्या हे दोघे अजून कसे आले नाहीत असा प्रश्न पडल्यानंतर ही बाब लक्षात आली. त्यावेळी, पाहणी केल्यानंतर दोघेही विद्युत तारेला चिकटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. दरम्यान, याप्रकरणी सावंगी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram