Sharjeel Usmani | शार्जील उस्मानीला शोधून अटक करु : अनिल देशमुख

Continues below advertisement

मुंबई : शार्जील उस्मानी सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तर प्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु, असं आश्वासन राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिलं आहे. देशमुख यांनी ट्वीट करुन याबाबत माहिती दिली.

त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे की, "पुण्यात 30 तारखेला झालेल्या एल्गार परिषदेत शर्जील उस्मानीने केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची व्हिडीओ क्लिपिंग पोलिसांनी तपासली असून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाराष्ट्र पोलीस सध्या त्याचा शोध घेत आहेत. तो सध्या महाराष्ट्राबाहेर आहे. तो बिहार, उत्तरप्रदेश, गुजरातमध्ये कुठेही असला तरी आम्ही त्याला शोधून अटक करु.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram