NCP Symbol : शरद पवार गटाला थोडा परीणाम जाणवेल, Chhagan Bhujbal यांची प्रतिक्रिया
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNCP Symbol : शरद पवार गटाला थोडा परीणाम जाणवेल, Chhagan Bhujbal यांची प्रतिक्रिया
निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालंय. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी हे नाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार गटाने हालचाली सुरू केल्या होत्या. त्यांनी तीन चिन्हांचा प्रस्ताव निवडणूक आयोगाकडे पाठवला होता. त्यामध्ये वडाचं झाड, कपबशी, आणि शिट्टी यांचा समावेश होता. मात्र निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह बहाल केलंय. दरम्यान 'तुतारी' चिन्ह मिळाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उद्या रायगडावर भव्य लॉन्चिंग सोहळा होणार आहे. या भव्य कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार आहे. नवं चिन्ह आणि पक्षाचं नाव मिळाल्यानंतर शरद पवार लोकसभा निवडणुकीसाठी रणशिंग फुंकणार आहेत.