Sharad Pawar : मविआ-मनसेच्या बैठकीतून पवारांची माघार, पुण्याला रवाना
Continues below advertisement
महाविकास आघाडी (MVA) आणि मनसे (MNS) शिष्टमंडळाच्या आज होणाऱ्या दुसऱ्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) अनुपस्थित राहणार आहेत. 'शरद पवार आज पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार पुण्याला जातील', अशी माहिती समोर आली आहे. मंगळवारी, शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यासह प्रमुख विरोधी नेत्यांनी मतदार यादीतील (Voter List) त्रुटींसंदर्भात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम (S. Chockalingam) यांची भेट घेतली होती. ही चर्चा अपूर्ण राहिल्याने आज पुन्हा बैठक होणार आहे. शरद पवार यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष किंवा इतर नेते या बैठकीला उपस्थित राहतील. पुण्यामध्ये पवार पत्रकार परिषद घेण्याचीही शक्यता आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement