Highway Gridlock: राज ठाकरेंच्या एका फोनवर प्रशासन हललं, हायवेवर अडकलेल्या 500 विद्यार्थ्यांना सुटका!
Continues below advertisement
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील (Mumbai-Ahmedabad National Highway) भीषण वाहतूक कोंडीत अडकलेल्या ५०० हून अधिक शाळकरी मुलांची सुटका करण्यात आली असून, या बचावकार्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या बिकट परिस्थितीत दादरच्या शारदाश्रम शाळा (Sardashram School) आणि मालाडच्या मदर तेरेसा ज्युनियर कॉलेजच्या (Mother Teresa Junior College) प्रशासनाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे मदतीची याचना केली होती. तब्बल आठ तास वाहतूक कोंडीत अडकल्याने विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. राज ठाकरे यांच्या एका फोननंतर पालिका प्रशासन, वाहतूक पोलीस आणि मनसेचे पदाधिकारी तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून बाहेर काढून जवळच्या हॉटेलमध्ये त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची सोय केली. मंगळवारी झालेल्या या घटनेमुळे महामार्गावरील वाहतूक नियोजनाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement