Sharad Pawar Speech Baramati : जिथं राम मंदिर बांधलं, तिथेच भाजपचा पराभव, पवारांचा हल्ला

Continues below advertisement

पुणे : लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीए आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं असून केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) नेतृत्वात सत्ताही स्थापन करण्यात आली आहे. नरेंद्र मोदींसह एनडीएमधील 72 खासदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यामध्ये, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाने मोदींना समर्थन दिले आहे, विशेष म्हणजे अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील एकाही खासदाराला मंत्रिपद देण्यात आले नाही. तरीही, विकासाच्या मुद्द्यावरुन आपण मोदी सरकारसोबत असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. आता, शरद पवार यांनीही बारामतीच्या (Baramati) विकासासाठी मोदींचीही मदत घ्यायला मागे-पुढे बघणार नाही, असे विधान केले आहे. बारामती येथे शरद पवार (Sharad Pawar) यांच्या उपस्थितीत व्यापारी मेळावा पार पडला. यावेळी, बोलताना बारामतीच्या विकासासाठी आपण सदैव तत्पर असल्याचं पवार यांनी म्हटलं. तसेच,  

आज आनंदाचा दिवस, असे म्हणत शरद पवारांनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. दुष्काळी दौऱ्यासाठी मी जेव्हा निघतो तेव्हा पावसाची सुरुवात होते, असा माझा अनुभव आहे. हे पावसासाठी चांगले वर्ष आहे, त्याचे परिणाम आपल्याला बघायला मिळतील. यंदा उत्तर प्रदेश साखर उत्पादनात दोन नंबरला गेला, राज्य सरकारने शहाणपण दाखवले नाही. महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन जास्त झालं, पण केंद्र सरकारने निर्बंध आणले, हे निर्बंध आणू नका, असे मी त्यांना सांगितलं होतं. मात्र, निवडणूक होईपर्यंत आम्ही तुमचे ऐकणार नाही, असे मला सांगण्यात आले. केंद्र सरकारने यंदा इथेनॉलला बंदी घातली,  त्यामुळे कारखानदारीचे नुकसान झाले. अपेक्षा अशी आहे की, हे चित्र आता बदलेल, असे म्हणत शरद पवार यांनी महाराष्ट्रातील साखर कारखानदारीवर भाष्य केले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram