Political Frame: एकाच फोटोत Sharad Pawar, Gautam Adani, मुख्यमंत्री Devendra Fadnavis, राजकीय चर्चांना उधाण
Continues below advertisement
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (शरदचंद्र पवार गट) शरद पवार यांनी शेअर केलेल्या एका फोटोमुळे राजकीय आणि उद्योग जगतात चर्चांना उधाण आले आहे. या फोटोमध्ये शरद पवार, उद्योगपती गौतम अदानी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकाच फ्रेममध्ये दिसत आहेत. आयपीएस अधिकारी प्रवीण पवार यांच्या मुलीच्या विवाहसोहळ्यानिमित्त हे सर्व दिग्गज एकत्र आले होते. शरद पवार यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, 'आयपीएस अधिकारी श्री. प्रवीण डांबराव पवार यांची कन्या प्राजक्ता आणि हिमांशू यांचा लग्न समारंभ होता. ज्याला उपस्थित राहिलो. नवदाम्पत्याला शुभाशीर्वाद दिले.' या कार्यक्रमाला आमदार शशिकांत शिंदे हे देखील उपस्थित होते, असेही त्यांनी नमूद केले आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement