Sharad Pawar Resignation Revoke: अध्यक्ष राहणार; भाकरी फिरवणार

Continues below advertisement

शरद पवार यांनी दोन मे रोजी दुपारी साडेबारा वाजता निवृत्तीची घोषणा केली आणि महाराष्ट्रात राजकीय भूकंप झाला. या भूकंपाचे हादरे तब्बल ७८ तासांनंतर थांबलेत. आणि ते थांबवलेत खुद्द शरद पवारांनीच... कार्यकर्त्यांची भावना, देशभरातील नेत्यांनी केलेलं आवाहन आणि राज्यातील नेत्यांनीही केलेल्या विनंतीला मान देत, शरद पवार यांनी राजीनाम्याचा निर्णय मागे घेतला. आणि दोन दिवस ज्या रस्त्यांवर कार्यकर्ते आंदोलन करत होते, त्याच रस्त्यांवर प्रचंड जल्लोष करत, फटाके फोडत आनंद व्यक्त केला. तर पवारांनी निवृत्तीचा मानस व्यक्त केल्यानंतर, ज्यांच्या डोळ्यांतून अश्रूधारा वाहिल्या त्या जयंत पाटलांनी कार्यकर्त्यांना चौकाचौकात साखर वाटण्याचं आवाहन केलंय. शरद पवार यांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेताना, संघटनात्मक बदल करण्याचं तसेच, नवं नेतृत्व आणि उत्तराधिकारी निर्माण करण्याचं वक्तव्य केलंय. त्यामुळे, पवार अध्यक्ष तर राहणार आणि भाकरीही फिरवणार अशी चर्चा आता सुरू झालीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram