Sharad Pawar on Security : झेड प्लस सुरक्षा,शरद पवारांकडून संशय व्यक्त

Continues below advertisement

Sharad Pawar on Security : झेड प्लस सुरक्षा,शरद पवारांकडून संशय व्यक्त 

महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांना केंद्र सरकारच्या वतीनं Z+ सुरक्षा देण्यात आली आहे. केंद्रीय एजन्सींनी संभाव्य धोक्यांचा आढावा घेतल्यानंतर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांना उच्चस्तरीय सशस्त्र व्हीआयपी सुरक्षा कवच देण्याची शिफारस केली. त्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयानं त्यांना झेड प्लस सुरक्षा देऊ केली आहे. दरम्यान, शरद पवारांनी मात्र, त्यांना देऊ केलेल्या Z+ सुरक्षेवरुन संशय व्यक्त केला आहे. मला दिलेली सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असल्याचं शरद पवार म्हणाले आहेत. 

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना नुकतीच केंद्र सरकारनं Z+ सुरक्षा देऊ केली आहे. पण, शरद पवारांनी मात्र, केंद्राच्या झेड प्लस सुरक्षेवर शरद पवारांनी संशय व्यक्त केला आहे. झेड प्लस सुरक्षा म्हणजे, निवडणुकीच्या काळात ऑथेन्टिक माहिती मिळवण्याची व्यवस्था असू शकते, असं शरद पवार म्हणाले आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram