Sharad pawar on Maval firing : मावळमध्ये स्थानिक भाजप नेत्यांनी आंदोलकांना चिथावलं : शरद पवार

केंद्राकडून तपास यंत्रणांचा सतत गैरवापर होतोय, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी केली आहे. अनिल देशमुख यांच्यावर आरोप करणारे पोलिस अधिकारी कुठे आहेत, असा सवालही त्यांनी केला. शरद पवार पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की,  सर्व राजकीय पक्षांच्या सहकाऱ्यांनी एकत्र बसायला हवं. 6 महिन्यांपूर्वी राजनाथ सिंह यांनी आम्हाला बोलावलं होतं.  त्यामध्ये भारत चीन बॉर्डरवर नेमकं काय सुरू आहे याबाबत आम्हाला सांगितलं होतं. केंद्रावर टीका करताना शरद पवार म्हणाले की, जम्मू काश्मिरमध्ये दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले. दुसरीकडे चीनसोबत 13 वेळा बैठका घेण्यात आल्या, पण एकही बैठक यशस्वी झाली नाही. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola