Sharad Pawar : मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आताच विचार करण्याची गरज नाही : शरद पवार

Continues below advertisement

Sharad Pawar : मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर आताच विचार करण्याची गरज नाही : शरद पवार
महाविकास आघाडीत मुख्यमंत्रिपदाच्या चेहऱ्यावरून उद्धव ठाकरे एकटे पडल्याचं चित्र आहे. काँग्रेसनंतर आता शरद पवारांनीही उद्धव ठाकरेंची निराशा केलीय. मुख्यमंत्रिपदाचा चेहरा निवडणुकीआधीच जाहीर करावा, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी लावून धरलीय. पण त्यावर विचार करण्याची आताच गरज नाही, नेतृत्वाचा निर्णय निवडणुकीनंतर संख्याबळानुसार घेता येईल, असं पवारांनी स्पष्ट केलंय. यासाठी पवारांनी १९७७ च्या निवडणुकीचं उदाहरण दिलं. काँग्रेसनही पवारांच्या या भूमिकेला पाठिंबा दिलाय. त्यामुळे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा जाहीर करण्याच्या ठाकरेंच्या प्रयत्नांना खीळ बसलीय.   

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram