Chandrashekhar Bawankule : उद्धव ठाकरे यांच्यावर राष्ट्रवादीचा जादूटोणा, शरद पवार भोंदूबाबा

सातारा - शरद पवार जादुटोणा करणारे भोंदुबाबा..त्यांची जादुटोणा केला म्हणून उद्धव ठाकरेंनी अफजल खान कबरीच्या अतिक्रमणास सरंक्षण दिले : चंद्रशेखर बावनकुळे

शरद पवार हेच राष्ट्रवादीतील भोंदुबाबा आहेत. उद्धव ठाकरेंना जादुटोणा करुन ठाकरेंना जाळ्यात ओढलं अशी टीका भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या नेत्यांवर केली. 

यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष जयकुमार गाेरे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले आदी उपस्थित हाेते. 

भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांच्यावर जोरदार टिका करत शरद पवार यांना टोमना मारला. ते म्हणाले राष्ट्रवादी काँग्रेसने उद्धव ठाकरे यांच्यावर जादुटोणा केला. यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्या प्रमाणे विचार करायला लागले आहेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola