sharad Pawar Party symbol : शरद पवारांची राष्ट्रवादीची मागणी मान्य, तूतारी वाजवणारा माणूस कायम
sharad Pawar Party symbol : शरद पवारांची राष्ट्रवादीची मागणी मान्य, तूतारी वाजवणारा माणूस कायम
राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस . चोकलींगम यांनी आज घेतलेल्या महत्त्वपुर्ण निर्णयानुसार ट्रम्पेट या निवडणूक चिन्हाचे तुतारी हे मराठी भाषांतर रद्द करुन त्या निवडणूक चिन्हाचा उल्लेख इथुन पुढे ट्रम्पेट असाच केला जाणार आहे. यामुळे येणार्या विधानसभा निवडणूकीत मतदान यंत्रामध्ये आता 🎺 या चिन्हाचा उल्लेख ट्रम्पेट म्हणून केला जाणार आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलींगम यांनी जारी केलेला हा आदेश राज्यातील सर्व जिल्हाधिकार्यांना प्राप्त झाला असुन त्या त्या जिल्ह्यांचे मुख्य निवडणूक अधिकारी या नात्याने आता जिल्हाधिकारी त्यांच्या ताब्यातील मतदानय़ंत्रांमधे तसे बदल करणार आहेत. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकार्यांचा हा निर्णय राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदंच़ंद्र पवार पक्षाला मोठा दिलासा माणला जातोय. राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर शरद पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाला तुतारी वाजविणारा माणूस हे पक्षचिन्ह मिळाले. मात्र लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील अनेक मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवारांनी ट्रम्पेट या वाद्याचे मराठी भाषांतर तुतारी असे केलेल्या चिन्हावर निवडणूक लढवली. या चिन्हाचा उल्लेख मतदानय़ंत्रात तुतारी असा केल्याने मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होत असून त्याचा फटका अनेक लोकसभा मतदारसंघांमध्ये बसल्याचा दावा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक आयोगाकडे केला होता. त्यानंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय दिलाय. त्यामुळे आता 🎺या चिन्हाचा उल्लेख येणार्या विधानसभा निवडणूकीत तुतारी नाही तर ट्रम्पेट असा केला जाणार आहे.