ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM

ABP Majha Marathi News Headlines 11 PM TOP Headlines 11PM

पक्ष आणि कुटुंबात फूट पडल्यानंतर आता पवारांच्या पाडव्यामध्येही फूट, शरद पवारांचा पाडवा गोविंदबागेत तर अजित पवारांचा पाडवा काटेवाडीत..

विधानसभेच्या तोंडावर शरद पवारांना दिलासा, ट्रम्पेट चिन्हाचं तुतारी हे मराठी भाषांतर रद्द, लोकसभेला फटका बसलेल्या भाषांतरावर अखेर तोडगा

'बाहेरचा माल चालणार नाही' या अरविंद सावंतांच्या वक्तव्यावर शायना एन सी यांचा हल्लाबोल, माल बोलणाऱ्यांचे निवडणुकीत जनता हाल करेल, असा इशारा..

शिवसेनेचे माहीमचे उमेदवार सदा सरवणकरांची मुख्यमंत्र्यांसोबत तासभर चर्चा, अर्ज मागे घेण्याबाबत समजूत काढल्याची माहिती, सरवणकर मात्र निवडणूक लढवण्यावर ठाम

प्रचारापूर्वीच प्रतिस्पर्ध्याला तांत्रिक बाबींवर कोंडीत पकडण्याचा प्रयत्न, अर्जातील त्रुटींवर विरोधी उमेदवारांचं बोट, कुठे गुन्ह्याची माहिती, कुठे शिक्षणाचे तपशील चुकीचे दिल्याचा दावा

पक्षपाती पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना का हटवत नाही? काँग्रेसचं निवडणूक आयोगाला पुन्हा पत्र..झारखंड, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राला वेगळा कायदा आहे का? काँग्रेसचा सवाल..

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola