Solapur Sharad Pawar : अजित पवार यांच्या निकटवर्तीयांवर झालेल्या IT कारवाईवर शरद पवार यांचा हल्लाबोल

काल राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार यांच्याशी संबंधित साखर कारखाने आणि त्यांच्या नातेवाईकांच्या घरी आयकर विभागानं धाडी केल्या. याबाबत बोलताना शरद पवारांनी हे वक्तव्य केलं. शरद पवार म्हणाले की, "काल अजित पवारांकडे काही सरकारी पाहुणे पाठवले होते. ते पाहुणे येऊन गेले. पाहुण्यांची चिंता आपल्याला अजिबातच नसते." पुढे बोलताना ईडीची नोटीस पाठवणाऱ्यांना जनतेनं येडी ठरवलं, असंही शरद पवार म्हणालेत.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola